- डॉक्टरांची घटनास्थळी भेट; उपाय योजनांचा घेतला आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :- कुदळवाडीमध्ये गोवर या संसर्गजन्य आजाराचे संशयित रुग्ण आढळल्याने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातील बालरुग्ण कक्षालातील डॉक्टरांनी यांनी कुदळवाडी परिसरातील बालकाची पाहणी करुन लसीकरणबाबत माहिती दिली. उपाय योजनांचा आढावा घेतला.
सध्या गोवर या आजाराची लक्षणे असणाऱ्या बालकांचे रक्ताचे नमुने घेतले. तसेच लसीकरण पूर्ण न झालेल्या बालकांना या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या आजाराची तीव्रता कमी करून त्यांचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच ज्या वस्त्यांमध्ये बालकांना लस घेण्यापासून रोखण्यात येते अशा ठिकाणी वस्त्यांमधील तज्ञांशी बोलून त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, स्वी. सदस्य दिनेश यादव उपस्थित होते.
















