न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :- “स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने घर घेणे आता अधिक सुलभ झाले आहे ” असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सीझन्स बँक्वेट ॲण्ड लॉन्स, दुर्गा चौक, यमुनानगर, निगडी येथे शनिवार (दि. १९) रोजी काढले. स्टेट बँक ऑफ इंडिया, पुणे वेस्ट आयोजित ‘एसबीआय ड्रीम होम एक्स्पो २०२२’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अंकुश शिंदे बोलत होते.
स्टेट बँक ऑफ इंडिया ए.ओ. पुणे डीजीएम जगन्नाथ साहू, पुणे वेस्ट रिजनल मॅनेजर हरेरामसिंग, आरएसीपीसी एजीएम संदीप कोटा, मुख्य व्यवस्थापक पवन ताहिलानी, समन्वयक समिक्षित शेडगे आणि स्वप्निल खोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीसह स्टेट बँक ऑफ इंडिया, पुणे वेस्टमधील सर्व शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी अधिक माहिती देताना हरेरामसिंग म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे अतिशय वेगाने विकसित होणारे महानगर आहे ही बाब लक्षात घेऊन एकाच छताखाली ग्राहक, बिल्डर्स आणि बँकर्स यांना एकत्रित आणावे या उद्देशाने ‘एसबीआय ड्रीम होम एक्स्पो २०२२’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १९ आणि रविवार, दिनांक २० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. सुमारे तीस दालनांतून पिंपरी-चिंचवड आणि नजीकच्या परिसरात आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार घरे देण्यासाठी विविध बिल्डर्स सिद्ध आहेत. तसेच गृहकर्ज, वाहनकर्ज यांना तातडीने मंजुरी देऊन सक्षम बँकिंग सुविधा पुरविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया कटिबद्ध आहे.


















