न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :-“ देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी आम्ही निष्ठापूर्वक काम करू तसेच सर्व धार्मिक,भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गा-हाणी हिंसाचाराचा अवलंब न करता शांततामयी आणि संविधानिक मार्गाने सोडवू “ असा निर्धार करून राष्ट्रीय एकात्मतेची गांभीर्यपूर्वक शपथ अधिकारी,कर्मचारी तसेच महिला बचत गट आणि नागरिकांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत घेतली.
प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील कार्यक्रमात भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह शहर अभियंता रामदास तांबे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख , राजेश आगळे, सिताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात तसेच कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे उपस्थित होते शपथेचे वाचन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा १९ नोव्हेंबर हा जन्म दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली जाते.
















