न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२२) :- वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर आदी भागात अनेक दिवसापासून दुषित पाणीपुरवठा होत आहे. काही दिवसांपासून हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे.
तसेच अनेक नळाच्या तोट्यांमध्ये जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या बदलत्या वातावरणामुळे साथीचे आजार वाढले आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरीय, चिकुनगुणिया आदीसारख्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. गोवरचे देखील संशयित रुग्ण आढळून आले आहते. महापालिका प्रशासन याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
















