न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२२) :- पोलीस स्टाफसह फिर्यादी महिला पोलीस या संजीवन सोहळ्यानिमित्त वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीरून आरोपी देहुफाटा चौक येथून आळंदीकडे श्री संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतूकीस प्रतिबंधित केलेला असताना देखील त्या रस्त्याने दुचाकीवरून जात होते. फिर्यादी यांनी आरोपींना थांबवून दुचाकी पुढे नेण्यास मनाई केली.
त्यावेळी आरोपीने आरडाओरडा करत फिर्यादी यांना ढकलून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच कर्तव्यावर असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीने मोठमोठ्याने शिवीगाळ केली. सह आरोपीने आरोपीला मदत केली. फिर्यादीच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस कॉन्सटेबल यांच्या तोंडावर आरोपीने फाईट मारून त्यांना जखमी केले. आरोपी पळून जात असताना तेथे असलेल्या जमावाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी जमावाच्या तावडीतून पळून जात असल्याने रस्त्याच्या बाजुला असेलेल्या पोलला धडकल्यामुळे किरकोळ जखमी झाला.
ही घटना रविवारी (दि.२०) सायंकाळी साते ते साडेसातच्या दरम्यान देहुफाटा चौक, आळंदी येथे घडला. या प्रकरणी महिला पोलीस यांनी दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २१) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भुषण मनोज जैन (वय ३०, रा. घोलपवस्ती, आळंदी), दत्तात्रय रामा कोकरे (वय २६, रा.गोलेगाव, खेड) यांना अटक केली आहे.
















