न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हजेरी लावली. शिवसेनेच्या वतीने यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट व आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आढळराव म्हणाले की, शिरूर लोकसभेचे संभाव्य राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार विलास लांडे व महेश लांडगे यांच्या दिलजमाईवर मी कधीही वैयक्तीक आरोप केले नाहीत.
शिवसेना, भाजपाची युती झालेली आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची एकत्र काम करण्याची मानसिक तयारी झाली आहे. मनं नक्कीच जुळून येतील. त्यामूळे उद्या राष्ट्रवादीकडून विलास लांडे शिरूरच्या रिंगणात उतरले तरी त्यांचा निभाव लागणार नाही. युतीसाठी मी आग्रही होतो, स्वत:साठी नव्हतो. काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत येण्याची संधी न देण्यासाठीच एकत्र लढणे फायद्याचे ठरणार आहे. तसेच संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे.











