- अपघातात विद्यार्थाचा जागीच मृत्यू; आई थोडक्यात बचावली..
- भाजपच्या अमित गोरखे यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडविली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- दुचाकीवरून मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना दुचाकीला मालवाहतूक ट्रकने जोराची धडक दिली. त्यात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या प्रतिभा स्कूलच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना शाहूनगर, गणपती चौक, (अमित कॉर्नर) बीआरटी बस स्टॉप चौक येथे घडली. सुदैवाने आई वाचली असून किरकोळ दुखापत झाली आहे. कु अथर्व अल्हाने (रा. सोहेल रेसिडेन्सी, स्पाईन रोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी उपस्थित राहत भाजपचे अमित गोरखे आणि तेथील नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीनं वाहतूक कोंडी सोडविली.
ह रस्ता अतिशय धोकादायक आणि वर्दळीचा झाला आहे. सकाळच्या वेळी या रस्त्यावर शाळेच्या बसेस, ट्रक आणि छोट्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. येथे वाहतूक पोलीसाची नेमणूक करावी, गतिरोधक उभारावेत तसेच नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.
– अमित गोरखे, प्रदेश सचिव भाजपा…
















