न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- मुंबई- बंगळूरू महामार्गावर वाकड ब्रिजवरून पहाटे ४ च्या सुमारास पिकअप वाहनं नाल्यात पडले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राठोड यांनी अग्निशमन विभागाला याबाबत कळवले होते. महापालिकेच्या राहटणी व पिंपरी अग्निशमन केंद्रांचे अग्निशमन बंब तसेच पीएमआरडीएचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता.
स्टेरिंग वाकल्याने चालकाचा पाय अडकून त्यात तो फसला होता. त्यामुळे गाडीचे स्टेरिंग कापून चालकाचा पाय सोडवून त्याला बाहेर काढण्यात आले. महेंद्र चौधरी (वय २१ वर्षे, रा. अमरावती) असे चालकाचे नाव असून, इतर दोघेही या अपघातात जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फायरमन अशोक इंगवले, विनायक नाळे, मयूर कुंभार, अथर्व मुजावर, सुरज धोंडीवाले व दिलीप गायकवाड यांनी हे रेस्कयू ऑपेरेशन पार पाडले.