न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी २०० कोटीचे कर्ज देतो, असा भरोसा व विश्वास आरोपींनी फिर्यादीला दाखवला. दोन लाखात ५ कोटीप्रमाणे २०० कोटी कर्जनिधी उपलब्ध करून देण्यासाठी आरोपींनी फिर्यादीला ७९,००,००० रुपये रक्कम ऑनलाईन बँक ट्रान्जेक्शन स्वरूपात भरायला लावली.
आजपर्यंत कोणतेही कर्ज मंजूर करून न देता फिर्यादी यांनी आरोपींना दिलेल्या रक्कमपैकी कोणतीही रक्कम परत न करता आर्थिक फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २/१/२०२० ते आजपर्यंत) कोलते पाटील लाईफ रिपब्लीक, आर ७, डी-१००७, हिंजवडी फेज-२, मारुंजी येथील घरी व पुणे परिसरात घडला.
याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी विद्याधर काशीनाथ जोशी (रा. ६ डी, पार्थ इन्क्लेव्ह, कॅनल रोड, कर्वेनगर), परेश शहा (रा. न्यू वसंत भवन को ऑप हो. सोसायटी तळमजला, मोक्श प्लाझासमोर, एस. की रोड बोरीवली (पश्चिम) मुंबई ४०००९२) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीसांनी आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.