न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरीतील डी. वाय. पाटील कॉलेज येथे बुधवारी (दि. २३) क्लास अटेंड करुन फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र बुलेट (एम एच १२ ई डब्ल्यु २३८३) वरुन घरी जात होते. त्या दरम्यान दुपारी ३.०० च्या सुमारास आरोपी व इतर मुले फिर्यादीच्या जवळ आले. फिर्यादीला ” तु इतके जोरात गाडी का चालवतोस, तुझ्यामुळे माझा भाचा तुझ्या गाडी खाली आला असता”, असे म्हणत आरोपी व त्याच्या सोबतच्या मुलांनी फिर्यादीला हाताने मारहान केली. फिर्यादीसह त्याच्या दोन मित्रांनाही आरोपींनी मारहाण केली. फिर्यादीला ” तुझा गेमच करतो ” अशी धमकी दिली.
या भांडणाच्या कारणावरुन दुपारी ३. १५ वा. सुमा अॅक्टीवा गाडीवरुन आलेल्या आरोपी व त्याच्या बरोबरच्या दोन ते तीन अनोळखी मुलांनी फिर्यादीसह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ, दमदाटी करून बांबु व दगडाने मारहान करण्यास सुरवात केली. आरोपीने ” आज तुला जिवंत सोडणार नाही ” असे म्हणत लाकडी बांबू फिर्यादी तरुणाच्या डोक्यात, डाव्या हातावर मारला. फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यामध्ये बांबू मारून बुलेटवरून त्याला खाली पाडले. आरोपींनी बुलेटचे नुकसान केले. फिर्यादीच्या मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो उपचारासाठी रुग्णालयात असून बेशुद्ध अवस्थेत आहे.
फिर्यादी शिवराज मंगेश जाधव (वय १७, रा. साई अपार्ट. फ्लॅट नं १०१, मोरया कॉलनी, विजयनगर काळेवाडी) याने आरोपी राहित माटे (वय २२ वर्ष), इतर ५ ते ६ जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.