न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- भोसरी विधानसभा मतदारसंघात लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालय, मॉडर्न हायस्कूल, निगडी आणि अन्य महाविद्यालयात नव मतदारांची मतदार यादीत नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील नवं मतदारांची Voter Helpline दवारे Online व ऑफलाईन स्वरूपात नोंदणी करून घेण्यात आली.
२०७ भोसरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. राणी ताटे, अपर तहसीलदार गीता गायकवाड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी क विभाग तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व अशोक पाटील सर प्राचार्य राजमाता जिजाऊ कॉलेज लांडेवाडी, पांडुरंग पवार, तहसीलदार करमणूक कर अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व सुनील कास्टेवाड महसूल सहायक २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले.