न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- रिक्षाने फिर्यादी (एमएच १४ जीसी ४८४३) खंडोबा माळ चौकातून घरी जात असताना भोसरीकडून येणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत रिक्षास धडक दिली. त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच रिक्षा चालकाच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी अपघात ठिकाणी न थांबता पळुन गेला. प्रेम महादेव जगताप (वय २७ वर्षे, रा. आनंदनगर, चिंचवड) असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना (दि. २६) रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली.
बंडु लक्ष्मण म्हात्रे (वय ३५ वर्षे, रा. केअर ऑफ हनुमंत भजबळकर यांचे घरी भाडयाने, विठ्ठल रुक्मीणी हौ. सोसा. मोरेवस्ती, चिखली) यांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.















