न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- पिस्टल आणि जिवंत काडतुसं आरोपीने जवळ बाळगत आरडा ओरडा केला. पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक निर्गमित केलेल्या आदेशाचे आरोपीने उल्लंघन केले. महाळुंगे पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे बेकायदेशिर विनापरवाना २५,००० रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) त्यास लोखंडी बॅरल, पितळी स्ट्रिगर, लोखंडी व पितळी मुठ असलेला व १,००० रू किंमतीचे दोन पितळी जिवंत काडतुस जप्त केला.
ही घटना (दि. २६) रोजी ६. १० वा. सुमारास केएसच चौकाजवळील, हुंडाई कंपनीच्या पाठीमागील पार्किंगमध्ये, बालुबेता. ता. खेड येथे घडली. सुर्यप्रताप गंधर्वसिंह (वय २२ वर्षे, रा. तेजस पडवळ यांचे रुममध्ये भाडयाने, इन्टसमन चौकाजवळ, इंडोस्पेस शेजारी, भांबोली, ता. खेड जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.