न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- फिर्यादीचा प्रोफाईल पाहुन मो. नं. अ १ (४०६) ७१९-२६९९ या अनोळखी मोबाईल धारकाने, तो करमवीर सिंग, कॅनडा येथे आर्टीटेक्ट असल्याचे भासवले. फिर्यादीवर प्रेम असून लग्न करण्यासाठी भारतात येत असल्याचे खोटे सांगुन आमिष दाखवले.
(दि. २७/०४/२०२२) रोजी दिल्ली विमानतळावर पोहोचल्याचे सांगितले व जास्त लगेज, सोन्याचे दागीने व रोख रक्कम यावरील टॅक्स / कस्टम भरण्यासाठी फिर्यादीला पेएटीएम तसेच ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे ए.यु. स्मॉल फायनान्स बँक खाते नं. २२११२५९३९१८७०४८ व दुसरे ए.यु. स्मॉल फायनान्स बँक खाते नं. २२११२५४८३८०१७८५३ या खात्यावर रक्कम पाठविण्यास लावले. त्यानंतर सर्व संपर्क बंद करुन फिर्यादीची एकुण रु. ५,८५,००० ची फसवणुक केली व रक्कमेचा अपहार केला.
हा प्रकार (दि. १२/०४/२०२२ ते दि. अद्यापपर्यंत) फ्लॅट बी/४०७, गायत्री लॅन्ड मार्क, फेज १, डांगे चौक, वाकड येथे घडला. ३४ वर्षीय महिला फिर्यादी यांनी मोन अ१ (४०६) ७१९-२६९९, मो.नं. ९६१६७४५७६४, मो.नं. ९९५८०४०५९७, मो.नं. ८०१९८२७१०२, मो.नं. ८३७४४५७०२६, स्टैंडर्ड चॅटर्ड बैंक अकाउंट नंबर २७०११२६२६४५, ए.यु. स्मॉल फायनान्स बैंक खाते नं. २२११२५९३९१८७०४८, ए.यु. स्मॉल फायनान्स बँक खाते नं. २२११२५४८३८०१७८५३ या बँक अकाऊंट धारकांनी, ९१९६१६७३९४२५ / PAYTM ०१२३४५६ ifsc.npci मो.नं. ८४२०११५७९४ या पेटीएम धारकाने, karan lokhande 565 @ gmail. com ई-मेल धारकाने व तपासात निष्पन्न होणा-या इतर अनोळखी इसम या अनोळखी मोबाईल धारकांविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.