न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- RANKFUTURE कंपनीतुन जोसेफ नावाच्या इसमाने मोबाईलवरुन फोन करीत फिर्यादीला ओरॅकल इंडिया कंपनीमध्ये तुमचा प्रोफाईल पाठवित आहे. तुमचा रिंकु अलेक्झांडर हा इसम इंटरव्युह घेणार आहे असे सांगतले. इंटरव्युह तसेच जॉबचे सिलेक्शन, सेकंड इंटरव्यूह, जॉब रिलीज अशी वेगवेगळी कारणे सांगितली. त्यासाठी फिर्यादी यांना फोन करीत https://rankfuture.com/pay2 या पेमेंट लिंकव्दारे ऑनलाईन पध्दतीने एकुण १८,६४,६६६ रुपये ट्रान्सफर करुन घेतले. काम न देता तसेच पैसे परत न करता फिर्यादीची फसवणुक करीत पैशांचा अपहार केला.
ही घटना (दि. २३/११/२०२१ रोजी पासून ते दिनांक २१/०२/२०२२ रोजी पर्यंत) बी/२४, सुवर्णपार्क, एन डी पाषण रोड, मराठा मंदिर शेजारी, बावधन या ठिकाणी राहते घरी असताना ऑनलाईन पध्दतीने घडली.
फिर्यादी भुपेश तुकाराम नेहेते (वय ३७ वर्ष, रा-बी / २४ सुवर्णपार्क, एन डी पाषण रोड, मराठा मंदिर शेजारी, बावधन) यांनी आरोपी मो नं ९२८९०७६६१९/ ७६७८२६९४४३ / ९२८९०७६६१३/ ९२८९०७६६१८/ ९२८९०७६६१७/ ९२८९०७६६१३ / ९२८९४९९७२१ / ९२८९१३२४५६/ ७६७८२६९४४३ / ९२८९०५०७६५ यावरुन फोन करणारा जोसेफ नावाचा इसम व त्याचे सोबत इंटरव्युह घेणारा रिंकु अलेक्झांडर, पैसे रिफंड करुन देणारा अमन श्रीवास्तव व मनिष पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही, यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.