- दोन देशी बनावटीचे पिस्टलसह; टोळी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरीतील वाईन शॉपवर आरोपी दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्य आवळल्या.
त्यांच्याजवळ ५०,००० रुपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल, ४००० चे जिवंत ४ काडतुसे, ५०० ची छ-याची बंदुक, ९०,००० रुपये किंमतीचे ७ मोबाईल फोन, दोन कोयते, दोन मिरची पुडया, १,२०,००० रुपये किंमतीची ४ दुचाकी वाहने असा एकूण २,६४,७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई (दि. २६) रोजी ५.४० वा. ब्लॅक पर्ल कॅफे, नव महाराष्ट्र शाळेच्या समोर, पिंपरीगाव येथे कॅफेच्या टेरेसवर केली.
याप्रकरणी यश कैलास भोसले (वय १९ वर्षे, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी), आकाश विनोद हराळे (वय २६ वर्षे, रा. बौद्धनगर, पिंपरी), निहाल मोहम्मद शेख (वय २५ वर्षे, रा. दत्तनगर, चिंचवड), अजय लोभाजी कांबळे (वय २० वर्षे, रा. दत्तनगर, चिंचवड), महेश महादेव चंदनशिवे (वय २६ वर्षे, रा. घरकुल, चिखली), अनिकेत सचिन पवार (वय २१ वर्षे, रा. दर्जी गल्ली, खडकी), अविनाश राकेश पवार (वय २३ वर्षे, रा. बौद्धविहाराचे जवळ, दत्तनगर, चिंचवड), शुभम दिपक घरवाढवे (वय १९ वर्षे, रा. अशोकनगर, भाटनगर शेजारी, पिंपरी), बालाजी रमेश ओगले (वय २५ वर्षे, रा. अशोकनगर, भाटनगर शेजारी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.