न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले हे थोर समाजसुधारक आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले क्रांतीमुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली, स्री शिक्षणाचे कार्याची सुरुवात घरातूनच करून त्यांनी शिक्षणातून पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका घडविली असून त्यांच्या महान विचारांचा वारसा सर्वांनी पुढे चालवावा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसेच पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपायुक्त मनोज लोणकर, रविकिरण घोडके, संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे ,संतोष अण्णा लोंढे, माजी नगरसदस्या शुभांगी लोंढे,सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, देशमुख, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे,अण्णा कुदळे, गिरीश वाघमारे, शंकर लोंढे,अशोक गजमल,तुकाराम गायकवाड प्रल्हाद कांबळे,रोहिणी रासकर तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे यांचा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित खंड देवून सत्कार करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले विचारप्रबोधन पर्वात शाहीर राजेंद्र कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आपली बहारदार शाहिरी सादर केली. त्यानंतर सिध्दार्थ मोरे यांनी मी जोतीराव फुले बोलतोय हा एकपात्री प्रयोग सादर केला.तर गायिका साधना मेश्राम यांनी अभिवादन क्रांतीसुर्याला हा संगीतमय कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
















