न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- आळंदी येथील एका गाळयामध्ये हार्पिक कंपनी नाव साधर्म्य असणाऱ्या नावाने नक्कल व बनावट केलेले टॉयलेट क्लिनर व फ्लोर क्लिनर केमीकलच्या दुकानात ठेवून ते गि-हाईकांना विक्रीसाठी ठेवले.
याबाबत माहित मिळताच तपास पथकाने (दि. २६) रोजी सायं. ६.०५ वा. चे सुमारास आळंदीतील माउली पार्क, पांगुळ समाज धर्मशाळा समोर, छापा मारला. तिथे रेकिट बेंचीझर या कंपनीचे हार्पिक टॉयलेट क्लिनर, हार्दिक नावाचे टॉयलेट क्लिनर व फ्लोर क्लिनर असा एकूण ३५,८८५ रुपयांचा माल स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तयार केल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी फिर्यादी इन्वेस्टीगेशन ऑफिसर यांनी आरोपी लौकिक दिलीप बोरुंदिया (वय ३२ वर्षे, रा. ७३०, पहिला माळा, माउली पार्क, पांगुळ समाज धर्मशाळा समोर, आळंदी), कौशिक दिलीप बोरुंदिया (वय ३० वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.