न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- इन्टाग्राम अकाऊंटवरून आरोपीने फिर्यादीला रिक्वेस्ट पाठवली. मोबाईलवरुन व्हाटसअॅप कॉल करुन, नंतर अमेरीकेतुन भेटवस्तु पाठवल्याचे आमिष दाखवले. वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन बोलणा-या महिला, तसेच [email protected] या मेल आयडी व त्यास रिकव्हरी मेल [email protected] चा धारक यांनी फिर्यादीच्या नावाने अमेरीकेतुन पार्सल आले असल्याचे आमिष दाखवले.
पार्सलमध्ये खुप ज्वेलरी व महागड्या वस्तु असल्याचे सांगुन त्यासाठी कस्टम ड्युटी चार्ज, अॅन्टी मनी लॉन्ड्रींग व इतर अनेक चार्जेसच्या नावाखाली तसेच Tesco Bank PLC या बँकेमध्ये खाते उघडण्याच्या नावाखाली वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगुन ९,४४,९३० रुपये रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर देखील वस्तू न पाठविता आर्थिक फसवणुक केली.
ही घटना (दि.१/३/२०२२) रोजी ११.५९ वा पासुन ते अद्यापपर्यंत. (दि. २६/११/२०२२ पर्यंत) २२/७, तुळजाई कॉलनी, लेन नं. ३, थेरगाव, वाकड येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी इन्टाग्राम अकाऊंट captain_david64) या अकाऊंटचा धारक, मो.नं. ४४८४४५००९८५७ ४४८४४५००९८५८. ८७९८०३५६८१, ८७९८४०५२३८, ९२०५५८०५९६, ८२६४६२१९१२ व ९९५३०२६३७२ धारक व अॅक्सिस बँक खाते नं. ९२२०१०००५२५३०६३, कॅनरा बँक खाते नं. ११००४१०१११८६. पंजाब नॅशनल बँक बैंक खाते नं. २९३८०००१०२१११४६८, येस बँक एसी.न. ०१७२५३१०००००१७२ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.