न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- गुजरात राज्यातील भुज येथील बी. मंगतराम ॲन्ड कंपनीतील शोरूममध्ये वाहन जमा करण्यासाठी फिर्यादीने आरोपी ड्रायव्हरला विश्वासाने दिले. सात लाखांचे BOLMAXX PUP CITY ३००० (Serial No N6L45455, Engine No N4L93800, Invoice No ७०१७७५९८९५) हे वाहन घेऊन आरोपी गुजरातकडे निघाला.
परंतु गाडी इच्छित स्थळी न नेता आजपर्यंत गाडी मिळून आली नाही. फिर्यादी कलीम शेख सलीम पिंजारी (वय ३८ वर्ष, निघोजे, ता. खेड जि. पुणे, मुळगाव मु.पो. मुक्ताईनगर, सिटफार्म, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी आरोपी बाबुलाल विश्वनाथ नवघरे (रा. जितापुर खेडकर पो ब्रम्ही ता.मुर्तीजापुर जि. अकोला, सध्या रा. माना, ता. मुर्तीजापुर, जि. अकोला) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण (महाळुंगे चौकी) पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.