न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- किराणा मालाच्या दुकानात फिर्यादी व फिर्यादीचा कामगार दोघे होते. दरम्यान एक अनोळखी इसम मारूती सुझुकी कंपनीच्या लाल रंगाच्या ब्रिझा गाडीतुन आला. फिर्यादीकडुन ३६,००० रूपये किंमतीचा किराणा माल खरेदी केला. पैसे देतो, तुमचा कामगार माझ्यासोबत पाठवा, असे सांगुन कामगारास गाडीबरोबर घेवुन गेला.
ब्ल्यु डार्ट, परंदवडी येथे फिर्यादीच्या कामगाराचा दोन हजारांचा फोन करण्यासाठी घेतला. कामगाराला तिथेच सोडुन पैसे न देता आरोपीने गाडीतील मालासह पोबारा केला. दुकान मालकाची एकूण ३८,००० रुपयांची फसवणूक केली.
ही घटना (दि. २८) सकाळी ८.१५ वा च्या सुमा. स्वरा प्रोव्हिजन स्टोअर, परंदवडी, ता. मावळ जि. पुणे येथे घडली. फिर्यादी दुकानमालक धनाजी राजाराम चव्हाण (वय ३८ वर्षे, रा. परंदवडी) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव परंदवडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.