न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. ३० वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील कन्व्हेयन्स शॉपिंग सेंटरमधील एकूण ३१ व्यापारी गाळ्यांची ८० वर्षांकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यासाठी दि. १४ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
तळ मजल्यावर ७ व्यापारी गाळे असून, त्याकरिता रु. ८७,१०० प्रति चौ.मी. तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर २४ व्यापारी गाळे असून, त्याकरिता रु.८०,४०० प्रति चौ.मी. आधारभूत दर आहेत. पेठ क्र. ३० येथील तळमजल्यावरील व्यापारी गाळ्यांचे कमीत कमी क्षेत्र १३.६० चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत रक्कम रु. ११,८४,५६० आहे. तर जास्तीत जास्त क्षेत्र २२.५० चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत रक्कम रु. १९,५९,७५० इतकी आहे.
इच्छुक व्यक्तींनी ई-लिलाव प्रक्रियेसंबंधीची सविस्तर सूचना, अटी व शर्ती यांच्या माहितीसाठी https://eauction. gov. in / www.pmrda.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्जासोबत आधारभूत किंमतीच्या १० टक्के अनामत रक्कमेचा डीडी कार्यालयास सादर करायचा आहे. व्यापारी गाळे विकत घेण्याच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी ऑफलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.