न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- आयसीआसीआय बँकेच्या एटीएमच्या लॉबीमध्ये प्रवेश केला. आरोपींनी संगणमत करून एटीएममधील रोख रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने कॉस्मीक डोअर व चेस्ट डोअर कशाच्या तरी सहाय्याने तोडुन नुकसान करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार (दि. १) रोजी पहाटे २. २० वा चे सुमारास म्हाळुंगे येथे घडला. फिर्यादी प्रशांत प्रभाकर आरवलकर (वय ३७ वर्षे रा. जलतरंग अपार्टमेंट, पहीला मजला, फ्लॅट नं. ६ एकतानगरी, सनसिटी रोड, हिंगणे खुर्द, पुणे) यांनी आरोपी आदित्य भिमराव कांबळे (वय २० वर्षे रा. पिंपळे गुरव), त्याचे इतर दोन साथीदार विशाल बंडु कारके (रा. चिखली), प्रथमेश प्रकाश जाधव (रा. पिपळे गुरव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.