- महिलेची पिंपरी पोलिसात धाव; दोघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- कामाचे पैसे घेण्याकरीता फिर्यादी महिला या आरोपीच्या घरी गेल्या होत्या. फिर्यादी यांनी आरोपींकडे कामाच्या पैशांची मागणी केली. आरोपी आणि सह आरोपी यांनी फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ केली.
तसेच आरोपीने फिर्यादीच्या अंगावर हात टाकला. फिर्यादीच्या नणंदेसमोर फिर्यादीच्या अंगावरील ड्रेसची डावी बाही फाडुन फिर्यादीस लज्जित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १) रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास आरोपीच्या घरी, पाण्याच्या टाकीसमोर, पिंपरीगाव येथे घडली. ४६ वर्षीय महिलेने आरोपी विनोद किसनचंद मतानी (वय ४२ वर्षे रा. पाण्याचे टाकी जवळ, पिंपरी गाव), सुनिल किसनचंद मतानी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.