न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश केला. २,६२,००० रुपये किंमतीचे ६५ ग्रॅम वजनाचे सोने, १४,००० रु. रोख रक्कम, १०,००० चे जेन्टस घडयाळ, ५००० रु. रोख रक्कम, मातीच्या गल्यात ठेवलेली ३००० रु. किं.चे वोट कंपनीचे घडयाळ असा एकुण २,९४,००० रुपये किंमतीचा माल घरफोडी करुन चोरून नेला.
हा प्रकार (दि. १) रोजी दुपारी ३.०० ते सायं ६.०० वाजण्याच्या दरम्यान फलॅट नं ११, साई व्हिला, ब. बिल्डींग, ग्रीन हाऊस हॉटेल शेजारी, मारीगोल्ड रोड, बावधन खुर्द व फलॅट नं १२, साई व्हिला बि विंग येथे घडला.
फिर्यादी प्रसाद दयानंद शिवशेटे (वय २३ वर्ष, रा-प्लॅट नं-११. साई व्हिला, बि बिल्डींग, ग्रीन हाऊस हॉटेल शेजारी, मारीगोल्ड रोड, बावधन खुर्द ता मुळशी जि पुणे) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















