न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- अज्ञात चोरटयाने राहत्या घरातुन फिर्यादीच्या पाकीटातील अॅक्सीस बँकेच्या डेबीट कार्डची चोरी केली. हिंजवडी व नांदेड येथून १,७२,००० रुपये काढले. पैसे व डेबीट कार्ड चोरी केल्याचा फिर्यादीचा शेजारी राहणाऱ्या मुलावर संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १०/११/२०२२) ते (दि. ३०/११/२०२२) रोजी हिंजवडी येथे घडला. फिर्यादी तेजस विठठल मुंढे (वय ३० वर्षे, सध्या रा. पंचरत्न चौक नारायण कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे सोनु साखरे यांच्या परी भाडयाने हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे मूळ रा. गाव निचपुर ता. किनवट जि.नांदेड) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.