न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये पोदार स्कूलचे २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने सर्वांना मंत्रमुग्ध केले. संगीतकार विरेंद्र डोके उपस्थित होते. स्नेह संमेलनाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्राचार्या शहनाज कोटार यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे स्वागत केले.
प्राचार्य शहनाज कोटार यांनी प्रास्ताविक करत पोदार स्कूलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा व राबविण्यात आलेले उपक्रम विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश याबाबत माहिती दिली.तर विद्यार्थ्यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
यावेळी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाकृती सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली व मंत्रमुग्ध केले गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या शिक्षिका बिना प्रेमकुमार यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनीने तर बिना प्रेमकुमार यांनी आभार मानले.