न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- पती-पत्नीच्या कौटुंबिक किरकोळ वादातून फिर्यादीच्या जावयाने फिर्यादीच्या ३४ वर्षीय विवाहित मुलीला मारहाण केली. तिचा गळा आवळून किंवा नाक तोंड दाबुन जिवे ठार मारले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १) रोजी रात्री ८.४५ ते ११.०० च्या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरी, फ्लॅट नंबर ३, मोरयागिरी अपार्टमेंट, शारदा कॉलनी, पिंपळे निलख येथे घडली.
फिर्यादी सुर्यकांत वामनराव मेमाने (वय ६० वर्षे, कदम वाकवस्ती) यांनी आरोपी आश्विन वसंतराव बडदे (वय ४० वर्षे, फ्लॅट नंबर ३, मोरयागिरी अपार्टमेंट, शारदा कॉलनी, पिंपळे निलख) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.