न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- पिंपरीतील गुरुनानक मार्केट येथे फिर्यादीचे ईलेक्ट्रीक पंप, ईलेक्ट्रीक केबलचे गोडाऊन आहे. (दि. ४) रोजी ३.३४ वा. दोन ते तिन अनोळखी चोरट्यांनी गोडाऊनच्या शटरखालील सिमेंटच्या कठडयास लावलेल्या विटा काढल्या.
लोखंडी शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमधील १,७४,९७५ रु किं चे ईलेक्ट्रीक पंप, ईलेक्ट्रीक केबल चोरुन नेली आहे. फिर्यादी रमेश लक्ष्मणदास जेठवानी (वय ५८ वर्ष, रा. साई सफायर बिल्डींग, बी २०२, पावर हाऊस रोड, पिंपरी), कैलास लक्ष्मणदास जेठवानी (वय ४६ वर्ष, पिंपरी) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















