न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- ‘ आपण फिरायला जाऊ, मी खराबवाडी ग्रामपंचायतजवळ येते ‘ असे आरोपी महिलेने अल्पवयीन फिर्यादीला फोनवर सांगितले. फिर्यादी आणि आरोपी दोघेही चाकण तळेगाव जवळील इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाच्या बाजुने पायी चालत एका शेतात गेले.
फिर्यादी मामाकडे राहण्यास आला होता. त्यावेळी आरोपी महिलेसोबत फिर्यादीची ओळख झाली होती. शेतात आरोपी महिलेने फिर्यादीसोबत गप्पा मारल्या. दरम्यान त्याच ठिकाणी रात्री ९.०० वा. च्या सुमारास आरोपी महिलेने फिर्यादीकडे संभोगाची मागणी केली.
दोघांनी संभोग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुरुष फिर्यादी याने आरोपी महिला (वय २० वर्षे) विरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















