न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- माजी नगरसेवक राहुल कलाटे आयोजित दीपोत्सव विशेष गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बालकलाकार श्रीनिवास पोकळे (फेम- नाळ) याच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल बर्ड व्हॅली, वाकड येथे संपन्न झाला.
यावेळी माजी नगरसेवक राहुल कलाटे, विठ्ठल कलाटे, विजय कलाटे, अर्जुन वाडघरे, विक्रम वाघमारे, जितेंद्र वाडघरे, अजय कलाटे, तुषार भुजबळ, सोमनाथ कलाटे, सागर कलाटे, प्रशांत वाघमारे, युवराज सायकर, बाळा कलाटे, काळू वाघमारे, निखिल कलाटे, गिरीश शेडगे, तेजस मंजिरे, विशाल कलाटे, प्रसाद कुंभार, नितीन केमसे, राहुल भुजबळ व स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे सोसायटी, मंडळ गटातील विजेते – प्रथम क्रमांक विस्टेरिया सोसायटी वाकड, द्वितीय क्रमांक आनंद पार्क मित्र मंडळ ट्रस्ट थेरगाव, तृतीय क्रमांक विनोदेवस्ती सोसायटी विनोदनगर, उत्तेजनार्थ क्रांतिवीर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळेवाडी, श्रीनाथ हाऊसिंग सोसायटी काळेवाडी, यश संकुल, सोसायटी वाकड. वैयक्तिक गटातील विजेते – प्रथम क्रमांक युवराज मानकर, वाकड, द्वितीय क्रमांक राज, वाकड गावठाण, तृतीय क्रमांक के जी चिल्ड्रन प्री स्कूल, वाकड, उत्तेजनार्थ आकाश पवार, कस्पटे वस्ती वाकड, सुजल सरनोबत, स्नेह प्रतिष्ठान, काळेवाडी.
आयोजक राहुल कलाटे यांनी विजेत्यांचे अभिनंदन तसेच स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्धल सर्वांचे आभार मानले.















