न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- सोमाटणे फाटा येथील कनिष्क मोबाईल स्टोअर, शॉपच्या छताचा पत्रा (दि. ४) रात्री १०:३० ते (दि. ५) रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास अज्ञात चोरटयाने उचकटला.
दुकानात प्रवेश करुन ९५०० आणि १३,००० रुपये किंमतीचे दोन ओपो कंपनी, एक विवो कंपनी आणि व्ही २३ मॉडेलचा २६,००० रुपये असा एकूण ७४,५०० रुपये किंमतीचे मोबाईल चोरून नेले आहेत.
फिर्यादी चेतन बाबुलाल परिहार (वय २६ वर्षे, रा. कुमकुम रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर ४०६, चोराईनगर, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी अज्ञात चोरटाविरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















