न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- दुचाकीवरून आलेल्या चोराने भर रस्त्यात तरुणीची गाडी थांबविली. ” मी चोर आहे, तुझे दागीने मला दे ” असे तरुणीला म्हणाला. तरुणीने मदतीसाठी आरडा ओरड केला असता तिचे तोंड दाबून हातातील उसाच्या कांडक्याने तरुणीला मारहाण केली.
आरोपीने तरुणीच्या गळयातील १ तोळा वजनाचे ४५,००० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, १५,००० किंमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, २.८ ग्रॅम वजनाची ८००० ची अंगठी आणि २०,००० किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकूण ८८,००० रुपये किमतीचा ऐवज काढून स्वतःची दुचाकी घटनास्थळी सोडुन पळ काढला.
हा प्रकार (दि. ६) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास संत तुकाराम साखर कारखान्याच्या पाठीमागील कच्या रस्त्यावर नेरे येथे घडली. २४ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी अनोळखी इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















