न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च) :- विद्यार्थ्यांना बालपनातच योग्य मार्गदर्शन लाभले तर भविष्यात ते विद्यार्थी ऊंच शिखर गाठू शकतात, चांगला भविष्यकाळ तुमच्या शिक्षणातच दडला आहे, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शहरातील विद्यालयातून शालांत परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अ प्रभाग अध्यक्षा, अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा, करुणा चिंचवडे, नगरसदस्या सुनिता तापकीर, शर्मिला बाबर, निर्मला कुटे, आरती चोंधे, आश्विनी चिंचवडे, आश्विनी जाधव, मिनल यादव, नगरसदस्य नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्य्क आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, नागरवस्ती विकास योजना या विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सुहास बहादरपुरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, आई-वडिलांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात याव्यात, भविष्याची वाटचाल ही अटीतटीची आहे. आपल्या यशामुळे आई – वडिलांना वेगळयाच आनंदाची अनूभुती येते, यश प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही प्रकारच्या अडचणीवर मात करुन धेय्यपूर्ती करता येते, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, लोककल्याणाच्या योजनांचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा. करीयरमध्ये नावलौकीक केला पाहिजे एखादा वैदयकीय क्षेत्रात मोठा डॉक्टर सर्जन होणे ही वेगळी बाब आहे, परंतू त्या सर्जनची ओळख व नावलौकिक ज्यावेळी जनमानसात होतो, तोच खरा सर्जन म्हणून नावारुपाला येतो. आपले जवान सरहददीवर देशसेवा करण्यासाठी कायम सज्ज असतात, या जवानांचे देशवासीयांसाठीचे योगदान बहूमूल्य आहे. देशसेवा करण्यासाठी आपण प्रत्याकाने सरहददीवरच जावून लढले पाहिजे असे नाही. तर सेवेच्या वेगवेगळया क्षेत्रांमध्ये
जावून देशसेवा करता येईल. विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकरचे गुण संपादन केले म्हणजे सर्व काही झाले असे नाही. तर प्रत्येकाने माणूस म्हणून, माणूसकी जोपासून जनमानसात काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा. परंतू समाज कारणाबरोबरच
राजकारणातही त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवून चांगले कार्य पार पाडावे, असेही ते म्हणाले.
महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांना अपेक्षित तरुण घडला पाहिजे. शहराचे तुम्ही भावी शिल्पकार आहात, जसे आई वडिल तुमच्या उन्नतीसाठी स्वप्न पाहात असतात. तसेच तुमचा परिसर व तुम्हाला मदत करणारे, तुमचे हितचिंतक
हे ही तुमच्यासाठी आशा बाळगत असतात. मोबाईलचा वापर अनिष्ट कामासाठी करु नये असेही त्या म्हणाल्या.
यावेळी व्याख्याते प्रा.अरविंद नातू, प्रा.आनंद देसाई, आणि सचिन वाघ यांनी करियर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. इयत्ता १० वी मधील विदयार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या १३४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी १ लाख रुपयांचेवितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले.
इयत्ता १० वी मधील विदयार्थ्यांना ८० ते ९० टक्के पर्यंत गुण प्राप्त केलेल्या २६४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी ६४ लाख १० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले. इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या ९४२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १ कोटी ४१ लाख ३० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले.
याप्रमाणे एकूण ४९२३ लाभार्थी विद्यार्थ्यांना एकूण रक्कम रुपये ६ कोटी ६ लाख ४० हजार फक्त इतकी प्रोत्साहनपर बक्षीसे डिजीटल पेमेंटव्दारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
प्रस्ताविकपर मनोगता मध्ये सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, यावेळी नागरवस्ती विकास योजना विभागाकडून विशेष बाब म्हणून १०० टक्कयापैंकी ९८ टक्के विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथील हल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. तर सुत्रसंचालन बी. के. काकडे यांनी केले, तर आभार अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी मानले.











