न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२२) :- कंटेनर चालकाने अविचाराने, हयगयीने, निष्काळजीपणे पाठिमागे न पाहता कंटनेर मागे घेतला. त्यावेळी कंटेनरच्या मागे उभे असलेल्या फिर्यादीच्या सासऱ्यांना धडक दिली. अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवून ते जागीच मृत्युमुखी पडले. अपघाताची कोणतीही माहिती न देता, उपचार न देता आरोपी पळुन गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
गणपत नारायण काळे (वय ५० वर्षे) असे मयत इसमाचे नाव आहे. ही घटना (दि. १८) रोजी सायं ७.०० वा. चे सुमारास महिंद्रा गार्डन हॉटेल, मोई चिंबळी रोडसमोर बरक्यु लॉजिस्टिक कंटनेर पार्किंगमध्ये, कुरुळी येथे घडली.
फिर्यादी दत्तात्रय उत्तम ढोपे (वय ३० वर्षे, रा. डोंगरेवस्ती, शरद सोनवणे यांच्या भाडेचे खोलीत, कुरुळी, मुळगाव रा. फोडशिरज, ता. माळशिरस, सोलापुर) यांनी आरोपी कंटनेर ट्रक (एचआर ३८ झेड ६१०६) वरील अज्ञात चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. चाकण (म्हाळुंगे चौकी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















