न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२२) :- दाखल गुन्हयामध्ये तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी लोकसेवक व खाजगी इसम यांनी तक्रारदाराकडे १०,००० रु लाचेची मागणी केली. हा प्रकार (दि. ३/१०/२०२२) वा. दुपारी ३.१६ ते ३.४९ च्या सुमारास पोलीस दूरक्षेत्र, पाईटगाव अंतर्गत चाकण पोलीस स्टेशन येथे घडला.
फिर्यादी रोहिदास वसंत कुडेकर (वय ३४ वर्षे, रामु अनावळे, पो. वाळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी पंदरकर (नेमणूक चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वर्ग ३) व खासगी इसम किसन आंद्रे (रा. पाळुगाव ता. खेड) यांना अटक केली आहे.
















