न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- पीएमपीएमएल या सार्वजनिक वाहतूक संस्थेत फिर्यादी कंट्रोलर म्हणून नोकरीस आहेत. फिर्यादी हे आपले सरकारी कर्तव्य बजावीत असताना आरोपींनी आपसात संगणमत केले.
प्रवासी महिलेच्या पर्सची चैन उघडून चोरी करताना फिर्यादीने त्यांना हटकले. आरोपींनी फिर्यादीशी झटापटी केली. धक्काबुक्की आणि हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी सरकारी कर्तव्य पार पाडीत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
हा प्रकार (दि. २०) रोजी सायंकाळी ५.३० वा. चे सुमारास पीएमपीएमएल बस स्टॉप, निगडी येथे घडला. फिर्यादी शत्रुघ्न पांडूरंग नेवरे (वय ४८ वर्ष, रा. सर्व्हे नंबर ४, संमनगर, जुनी सांगवी) यांनी महीला आरोपी (वय २२ वर्षे), विनोद संजय बाजड (वय ३५ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
















