न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- हातामध्ये लोखंडी कोयते घेवून आरोपी रस्त्यात उभे होते. फिर्यादी पोलिसाला पाहून आरोपींनी त्यांची दुचाकी हयगयीने व निष्काळजीपणे चालविली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि २२) रोजी रात्री २.२८ ते २.४२ वा. दरम्यान मॅग्झिन चौकातील प्रगती हॉटेलसमोर, ममता चौक, दिघी येथे घडली.
आरोपी सुजल सुंदरराज गावीडन (वय १९ वर्षे, रा. जहागीरनगर, हनुमान मंदिराजवळ, हडपसर), आकाश तानावडे (रा. हडपसर), आकाश वाघमारे (रा. मांजरी), विकास (रा. हडपसर) यांच्या विरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















