न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- वडमुखवाडी येथील मंदिराजवळ एक ते दिड वर्षाच्या अनोळखी मुलीला तीचे कायदेशीर पालक यांनी कुणीही सांभाळ करणार नाही हे माहिती असताना एकटीला रस्त्यावर सोडून देत तीचा परित्याग केल्याची घटना घडली आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास साई मंदिराच्या विरुदध बाजुला, दिघी आळंदी सर्विस रोडवरील फुटपाथवार घडला. दिघी पोलिसांनी अज्ञात पालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















