न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूल मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे नियमांच्या अधीन राहून काम करणाऱ्या व परवानाधारक मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी न्यू पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील बर्गे यांनी केली आहे.
न्यू पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी सुरेश आव्हाड यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक आहेत. त्यांच्या मार्फत शहरातील नागरिकांना मोटार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा परवाना घेऊन मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू केलेल्या चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच ड्रायव्हिंग टेस्टच्या मैदानावर ड्रायव्हिंग टेस्ट फक्त एमएस फॉर्म असलेल्या गाडीवर व एमएस फॉर्म व्हॅलिड असलेल्या गाड्यांनाच परवानगी देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर केवायसी केलेले रिनिव्हल व डीडीएलचे पेपर आरटीओ कार्यालयाने त्वरित चेक करून लवकरात लवकर सहमती द्यावी, अशा विविध मागण्या असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील बर्गे, उपाध्यक्ष शरद घारे, कार्याध्यक्ष नीलेश साळुंखे, सचिव दिनेश तट्ट, खजिनदार राजेंद्र भारांबे, उपकार्याध्यक्ष सुनील होले, सहखजिनदार स्वप्निल चव्हाण, सल्लागार नानासाहेब शिंदे, रविराज शहा, आप्पा चव्हाण, स्वप्निल पवार, प्रकाश मुरकुटे, विजय परदेशी, बबन मिसाळ, रवींद्र कुदळे, अकबर शेख, अनिल गायकवाड, संतोष चोरघे, संतोष आयोळकर उपस्थित होते.















