न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- दारु बनविणारी कंपनी स्वतःच्या मालकीची आहे, असे खोटे सांगुन कंपनीची पुणे जिल्हयासाठी डिलरशिप देतो, असे फिर्यादीला आमिष दाखविले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून डिलरशिपसाठी १५ लाख रुपये गुंतवणुक करण्यासाठी प्रवृत्त केले. पैसे भरल्यानंतर झालेल्या करारानुसार आरोपींनी फिर्यादी यांना कोणत्याही मालाची डिलीव्हरी न करता डिलरशिपसाठी भरलेले १५ लाख रु. स्वता:च्या फायद्याकरिता वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार ऑगस्ट २०२१ मध्ये रहात्या घरी, बिल्डींग आर ७/सी ६०४, लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील वेन टाऊनशिप, मारुंजी येथे घडला.
फिर्यादी दत्तु सोमनाथ गवळी (वय ५३ वर्ष, रा. मारुंजी) यांनी आरोपी करुन कौरा (रा. ग्रेवल इन्क्लेव, लेन नं १, नभा रोड, पटीयाला, पंजाब, रिमझिम मुखर्जी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अजिंक्य अनिल कासारे (वय २८ वर्ष, रा फ्लॅट नं ए १४/४०२, मंगलभैराव, नांदेड सिटी, पुणे.) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















