- खुनाच्या गुन्ह्यात होता वॉन्टेड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- अनैतिक संबधास बाधा ठरणा-या मैत्रीणीस आरोपीने पिंपरीतील के.एस.बी. चौक येथून जबरदस्तीने अपहरण करुन तिला त्याच्या घरात कोंडून ठेवुन तिची निर्घुणपणे हत्या केली होती. या प्रकरणी भोसरी पोलीस स्टेशन येथे (दि. २१/४/२००८) रोजी गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी गायब होता. नियमितपणे त्याचा पत्ता बदलत होता. तो त्याच्या मुळ गावी तसेच सासुरवाडीसही सापडत नव्हता.
हा आरोपी एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतील प्रकाश चव्हाण या गँगचा सक्रिय सदस्य असल्याने तसेच त्याच्याविरोधात यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल होते. पोलीसांनी तपासाची दिशा बदलुन त्याच्या १५ वर्षापुर्वीचे सहआरोपी व प्रकाश चव्हाण गॅंगचे सदस्य यांच्यामार्फती तपास करण्याचे ठरविले. त्यानुसार तपास करत असताना माहिती मिळाली की, आरोपी खेडेगावात राहत असून चाकण एमआयडीसीमध्ये मिळेल त्याप्रमाणे मजुरी काम करत आहे. तसेच तो अल्पावधीतच औरंगाबाद येथे जाणार असल्याचे समजले. पोलीसांनी वाकी गावात जावुन गोपणीय माहिती काढली असता तो तेथे नाव बदलुन रहात असल्याचे समजले. तसेच दिवसभर तो चाकण एमआयडीसीमध्ये मिळेल ते काम करत असल्याने दिवसा घरी असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा १५ वर्षापुर्वीचा फोटो असल्याने व सध्य स्थितीमधिल फोटो उपलब्ध नसल्याने त्यास चाकण एमआयडीसी परिसरात शोधणे अवघड होते. त्यामुळे पोलीसांनी वाकी परीसरात सापळा लावुन आरोपी रात्री घरी जात असताना त्याला ताब्यात घेतले. आप्पा गोमाजी मोहिते (वय ५० वर्ष, बालाजी नगर झोपडपटी, भोसरी, सध्या मु.पो. वाकी, ता. राजगुरुनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे मयत महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. तसेच त्याच्या पत्नीस घटस्फोट घेवुन तिच्याशी लग्न कर, नाहितर त्याचा गुन्हा दाखल करील, अशी धमकी देत असल्याने महिलेचा खुन केला असल्याचे आरोपीने कबुल केले.
आरोपीस पुढील कारवाईसाठी भोसरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त कुमार लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त संजयकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस नाईक १४१७ महाडीक, पो.ना. १५२४ सचिन मोरे, पो.शि. महाले यांच्या पथकाने केली आहे. तपासकामात पो.ह. कमले व प्रशांत माळी यांनी तांत्रिक विशेष सहकार्य केले आहे.















