- भर रस्त्यात गाडी अडवून कोयत्याच्या धाकाने तरुणाला लुटले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२२) :- अॅक्टिवा (एम.एच १४ एफ. डी. ०८४३) या गाडी वरुन जात असताना फिर्यादीची आरोपीने गाडी अडवुन गाडीची चावी काढली. ” मादरचोद, मुझे पैसा दे ” असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. तेव्हा फिर्यादी यांनी “किस बात का पैसा, में नही देने वाला” असे म्हणुन नकार दिला. त्यावेळी आरोपी ‘ थाने में इधर का भाई हूँ; जिसको फोन करना है कर, लेकीन तुझे पैसा देना पड़ेगा, असे फिर्यादीला म्हणाला.
तेव्हा फिर्यादीने त्यांचा भाऊ अक्षय यास मदतीसाठी बोलावले. त्यावेळी आरोपीने दोघांकडेही पेशांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीने व त्यांच्या भावाने त्यास नकार दिला. आरोपीने फिर्यादीच्या कानाखाली मारुन त्याच्या पॅन्टमध्ये कंबरेला खोसलेला लोखंडी कोयता बाहेर काढत, ” मादरचोदो मैं इस एरियेका भाई हु; मालुम नही क्या, पैसा दो, नही तो खतम कर दूंगा ” असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादी यांनी मदतीसाठी आजुबाजुच्या लोकांना आवाज दिला. पण आरोपीच्या भितीने लोक पळून निघुन गेले. कोणीही मदतीसाठी आले नाही. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील पाकिट जबरदस्तीने काढुन त्यामधील १००० रुपये काढून घेतले व कोयत्याचा धाक दाखवून ‘ तुमको जिधर तक्रार करणी हे करो ‘ असे धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २५) रोजी सायं ५.०० वा. चे सुमारास विद्या विकास शाळेसमोर, जामा मस्जिद रोड, कासारवाडी येथे घडली. फिर्यादी पियुष वासुदेव जाधवाणी (वय १८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ६०३, सी विंग, सुखवाणी कास्टल, सिंडीकेट बँकेजवळ, पिंपरी यांनी आरोपी शकिल कासम शेख (वय २५ वर्षे, रा. नांगेरी चाळ, कासारवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
















