- भोसरीतील घटना; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- विश्वासघात करुन आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीचा २४,००० रु. किंमतीचे इंटेल कोर कंपनीचे असेम्बल ३ कॉम्प्युटर, बा. की. अ. २५,००० रु. किंमतीचे १ प्रिंटर कॅनॉन कंपनीचा जुवा. कि ३५,००० रु. किंमतीचा हा डिक्स सी. गेट २ टी बी हार्ड डिक्स, १०,००० रु. किंमतीचा १ मॉनिटर एल.जी. कंपनीचा जु.वा. किं.अं. ५१,००० रु. किंमतीचा कॅमेराचा फ्लॅश लाईट गॉडेक्स कंपनीचा जु.वा. किअं.१,५०० रु. किंमतीचा कॅमेरा एक्सेसरी जु.वा.कि.अं., २०० रु. किंमतीचा टिपीलिंगचा स्विच जु.वा. किं.अं., १०,००० रु. किंमतीचा एक आयव्हा कंपनीचा एल ईडी टिव्ही मोडेल नं. ५०० एस जु.वा.कि.अं., ५००० रु. किंमतीचा रेडमी १० कंपनीचा एक मोबाईल जु.वा. किं. अं., ००.०० रु. किंमतीचे कागदपत्रे, ४०,००० रुपये रोख रक्कम असे एकुण १,०१,७०० रु. किं.चा मुद्देमाल व कागदपत्रे संगनमताने घेवुन गेले व अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०३/१२/२०२२) रोजी ११.०० ते (दि.५/१२/२०२२) रोजी ३.०० वा चे दरम्यान सेक्टर नं. १. इंद्रायणीनगर, पी.सी.एम.टी. बस डेपोजवळ, भोसरी येथील शाहू शिक्षण संस्थेच्या आवारात घडला.
फिर्यादी अजय आबासाहेब साळुंखे (वय ४२ वर्षे, रा. सेक्टर नं. १, प्लॉट नं १, राणी महीला महाविद्यालय इंद्रायणीनगर, भोसरी पुतळा) यांनी आरोपी विनायक सुर्यकांत पाटील (अंदाजे वय ३५ वर्षे), नुतन जाधव अंदाजे (वय ३३ वर्षे), महिला आरोपी, रोहीत जाधव (सध्या रा. भोसरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















