न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- कॉलेजमधील मुलांना आरोपींनी हाताने मारहाण केली. हातामध्ये लोखंडी कोयते घेवुन कॉलेजमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दंगा करुन आरोपी पळुन गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २७) रोजी दुपारी १.३१ वाजण्याच्या सुमारास बावधन येथील सुर्यदत्ता कॉलेजशेजारी असणाऱ्या मोकळया मैदानामध्ये घडली.
हिंजवडी पोलिसांनी आरोपी सोहम संजय रास्ते (वय २० वर्ष, रा. पिंगारा हॉटेलच्या शेजारी, बावधन हायवे लगत बावधन) याला अटक केली असून, मारुती स्विप्ट (८२१३) मधुन आलेले २ ते ३ इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















