न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- दुचाकीवरून (एम.एच.१४. ई.ई.८७७६) दुचाकीवरून फिर्यादी व त्यांचा मित्र तुषार जात होते. दरम्यान रस्ता क्रॉस करीत असताना उजव्या बाजुने येणाऱ्या दुचाकी (एम.एच.१४ बी.व्ही. ८८८९) चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने, अविचाराणे, हयगयीने चालवली.
फिर्यादी बसलेल्या दुचाकीला उजव्या बाजुने येवुन धडक दिली. अपघातात फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या पंजास, गुडघ्यास जखम झाली. फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यास, चेह-यास मार लागून तेही गंभीर जखमी झाले. दोन्ही गाड्याचे नुकसान करून, अपघात करणारा टु व्हीलर चालक हा देखील जखमी झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २५) रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास बिर्ला हॉस्पीटल जवळ, दत्तनगर समोरील रस्त्यावर थेरगाव येथे घडली. फिर्यादी अमन अहमद शेख (वय २१ वर्षे, रा. संत तुकारामनगर, संस्कार हाईट्स समोर, वाल्हेकरवाडी) याने आरोपी टु व्हीलर (एम.एच.१४ बी.की. ८८८९) वरील चालका विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















