न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा ६८ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. हजारो बौद्ध बांधवांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती.
युवा रत्न सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाभोजनदान व समाजप्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचशिलाचे ध्वजारोहण आदरणीय अॅडव्होकेट एम.बी. वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले, व आदरणीय भंते नागघोष महाथेरो यांच्या वतीने महाबुद्ध वंदना व धम्म प्रवचन घेण्यात आले.
युवारत्न सेवा समिती संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ वाघमारे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख सुभान अली सुप्रसिद्ध व्याख्याते अध्यक्ष दंगा मुक्त महाराष्ट्र मिशन, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक राहुल शिंदे, संकल्प गोळे, विजय उलपे, न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर, शरद जाधव निवृत्त कार्यकारी अभियंता, सुरेश गायकवाड पुणे जिल्हा कला विकास संघ सेक्रेटरी, सामाजिक कार्यकर्ते विलास पोळ, युवराज प्रगणे, रहीम शेख, सूर्यभान तायडे व इतर धम्मसेवक उपस्थित होते. यावेळी अन्नदानाचे आयोजन केले होते. असंख्य बौद्ध बांधवांनी अन्नदानाचा लाभ घेतला.















