न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- शिवभूमी शिक्षण संस्था आणि पुणे डिस्ट्रीक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेने स्व. शिक्षण महर्षी श्री. शिवाजीराव कोंडे स्मृती निमित्त एक दिवसीय जलद बुध्दीबळ स्पर्धेचे उद्या रविवारी (दि. १-१-२०२३) रोजी शिवभूमी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, यमुनानगर, निगडी येथे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा बुध्दिबळ संघटना या स्पर्धेला तांत्रिक मदत करणार आहे. या स्पर्धेत ५१ हजाराची रोख पारितोषिके, त्याचबरोबर १८ चषक व ५० हून अधिक मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत. ही स्पर्धा ८/१०/१२/१५ या वर्षाखालील गटांमध्ये तसेच खुल्या गटांमध्ये जागतिक बुध्दीबळ संघटनेच्या नियमानुसार खेळविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा सकाळी ९.३० वा. सुरू होणार असून त्याच दिवशी संध्या. ७.३० वा. बक्षीस वितरण समारंभ होईल. स्पर्धेसाठी संस्थेचे स्पर्धा संचालक राजेंद्र कोंडे (मोबा. ९८२२३०३५४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.