न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- पथदिव्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पालिकेच्या विद्युत विभागाचे आहे. दररोज पथदिवे सुरु करणे व बंद करण्यासोबतच ज्या भागात पथदिवे नादुरुस्त आहेत, ते दुरुस्त करणे हा त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग आहे.
मात्र, बहुतांश भागात दिवसाही पथदिवे चालू असल्याचे निदर्शनास येते. बिजलीनगर येथील महावितरण कार्यालयासमोरील पालिकेचे पथदिवे आज शनिवारी (दि. ३१) रोजी चक्क दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान सुरु होते. या पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना खुणावत होता. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रोषणाई केली आहे? अशी मिश्कील टिपण्णी वाटसरू करताना दिसले.
एकंदरीत विद्युत विभागाने त्या-त्या भागातील विद्युत वाहिनींची तपासणी करुन असे पथदिवे का सुरु राहतात, याची माहिती घेणे आवश्यक आहे.


















