- तिघांकडून ड्रायव्हरला धमकी अनं मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- ” तुला तुझी गाडी येथे लावायची असेल तर, तु आम्हाला महीण्याला १००० रूपये हप्ता रूपये दे ”, अशी आरोपींनी फिर्यादीकडे मागणी केली. फिर्यादी हे त्यावेळी इरटीका गाडी (एम एच.४३ ए.टी. ११२५) सर्व्हिस रोडला लावून चहा पीत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले होते. त्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपी यांनी फिर्यादीला शिवागाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. हप्ता दिला नाही तर, तुला गाडीसह जाळुन टाकीण, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.२९) रोजी सायं ६.०० वा. चे सुमारास वाकड ब्रिज, राजयोग हाटेल जवळील टपरी शेजारी, वाकड येथे घडली.
फिर्यादी सुंदर शिवशरण पाचवेकर (वय ३० वर्षे, रा. घर नंबर ३, साई कॉलनी, ताथवडेगाव) यांनी आरोपी सचिन पवार, अरविंद शिर्के, अभिषेक गावडे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















